Sunday, May 9, 2021

मातृदिनानिमित्त काही चार शब्द

 

जागतिक "मातृदिन" जगामध्ये सर्व ठिकाणी साजरा केले जाते. आई या शब्दाचा अर्थ खूप मोठा आहे. आई ही जगातील सर्वात महत्वाची व्यक्ती आहे. आपल्याला आई ने खूप काही शिकवते आई ही आपलं पहिलं शिक्षक आहे आणि आई ला आपण सर्व काही आपले मनातील गोष्टी त्याला सांगतो त्याचाशी शेयर करतो. कितीही संकटे आले तरीही आई आपल्याला खूप मदत करते धीर देते सर्व गोष्टीला मदत करते. आई वडिलांना कधीही विसरू नका मित्रांनो, आई वडील आपल्याला जेवढं प्रेम करतात आपली काळजी घेतात तेवढं या जगात कोणच आपल्याला तेवढं काळजी घेत नाहीत. त्यांचं स्थान कोणच घेऊ शकत नाही, आईचे जग हे त्यांचं मुलं आणि परिवार ह्यातच ती जग पाहत असते आई तिच्या मुलांसाठी परिवारासाठी खूप काही करते कितीही कष्ट येऊ दे संकटे येऊ दे आई कधीच घाबरत नाही,कारण आई ही आई असते.आपल्या आई वडिलांना रोज नमस्कार करा त्यांना कधी विसरू नका मित्रानो अनाथ मुलांना कळतो त्यांचं महत्व आपलं नशीब चांगलं आहे आपण खूप भाग्यवान आहोत  आपल्याला आई वडील आहेत या जगात आशा खूप लोक आहेत की ज्यांना सर्व काही असून सुद्धा आई वडील विना व्यर्थ जीवन वाटतो माझ्या सर्व मित्रांना विनंती आहे आई वडिलांना आनंदीत ठेवा त्यांची सेवा करा त्यांना आदराने बोला त्यांच्या सोबत वेळ घालवा त्यांच्या म्हातारपणी तुम्ही सहारा द्या. मातृदिन एक दिवस नाही तर रोज साजरा करा रोज आपल्या आई वडिलांना सुखी ठेवा.
"देवा सुखी ठेव तिला जिने जन्म दिले मला"
धन्यवाद मित्रांनो आपला मौल्यवान वेळ काडून माझा  blog वाचल्याबद्दल
मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा

Sunday, November 29, 2020

आनंदीत जीवन जगणे म्हणजे काय ?

मनातले विचार पूर्ण वाचा मग समजेल

नमस्कार, मी ओंकार फार लोकांना माहिती नसेल आपण नूतकाच फेसबुक वर *मनातले विचार* हा पेज काढलेल आहे. याच्या माध्यमातून काही आपल्या आयुष्यातील अनुभवे तुमच्या समोर मांडतोय
‌      आनंदीत जीवन जगणे म्हणजे काय आनंद माणसाला कधी होतो सांगा जेव्हा सगळ्या गोष्टी त्याचा मनासारखं होतात तेव्हा ना बरोबर का! आता या सर्वाचा उत्तर बरोबर असाच येईल आनंदीत जीवन जगणे म्हणजे मजा करणे, आवडतं ते खाणे पिणे, हा नाही आहे आनंदीत जीवन जगणे म्हणजे आपल्या अंतरमनाला वाटलं पाहिजे की जे काही आपण जीवन जगतोय ना ते आनंदीत आणि प्रामाणिक पणे आरोग्यदायी जगतोय हे वाटलं पाहीजे प्रत्येक माणसाला त्याचा स्वतःचा कुठलाही चूक असुदे हे त्याला कधी कळत नाही त्याचा मनाला कळतो जेव्हा तो स्वतःला आरशात बघतो ना तेव्हा कळतो प्रत्येकाने आनंदीत जीवन जगण्यासाठी खूप काही करतात नवीन घर घेतात नवीन मोबाईल घेतात  गाडी,कार घेतात पण एकदा मनाला विचारा अरे तू आनंदी आहेस का? असा प्रश्न कधी आपल्याला पडलाय का? कारण आजच्या युगात जे जीवन जगतोय ते फक्त कुठल्या ना कुठल्या टेन्शन मध्येच जगत असतो. प्रत्येकाच्या जीवनात अडचणी येतात व ते दूर होतात पण तरीही आपण आनंदी राहत नाही कारण आनंदी राहिल्यासारखं आपण फक्त जगाला दाखवतो बरोबर ना! माणूस कधी आनंदी राहतो माहिती आहे का ज्यावेळेस त्याच्या अवती-भोवती वातावरण चांगला असतो त्याची माणस त्याच्याबद्दल चांगले विचार करतात आणि तो माणूस सुद्धा त्याचा मनासारखं वागतो तेव्हा आणि दुसऱ्या गरजू लोकांना मदत करतो ना तेव्हा आपल्या डोळ्यात एक वेगळा आनंदच दिसून येतो . आनंदीत जगण्यासाठी आपण काय करायला पाहीजे सर्व मित्रांना परिवारात सगळ्यांशी चांगले राहणे प्रेमाने बोलणे थोर लोकांना आदर पूर्वक बोलने गरजूंना मदत करणे मी म्हणत नाही की तुम्ही सगळ्यांना करा पण करा एखादा माणसाला तरी मदत करा त्यापासून जे आनंद मिळतो ना तेे कधीच कुठल्याही कारणाने मिळत नाही


‌वाचल्यावद्दल खुप खूप🙏🙏
‌आवडल तर जास्तीत लोकांना शेयर करा

Saturday, June 13, 2020

कोरोना वैश्विक महामारी संकटाला घाबरू नका

कोरोना वैश्विक महामारी हे गेल्या 8 महिन्यापासून जगभरात भरपूर प्रमाणात पसरलेला आहे. जगात इतकं संकट निर्माण झाले की लॉकडाऊन करावा लागला. हे लॉकडाऊन करून सुद्धा ही संख्या अजून वाढतच चालली आहे. लोकांमध्ये भीतीचा वातावरण निर्माण झाला त्यामुळे काही लोकं धक्क्याने मृत्यू झाले तर काही उपचारा दरम्यान मृत्यु झाले 
भारतामध्ये कोरोनाचा संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे पण आपल्या देशात बरे सुद्धा म्हणजे कोरोनामुक्त सुद्धा खुप जण चांगले होत आहेत. लोकांना सांगायचे तात्पर्य एवढंच की तुम्ही तुमच्या मनात भीती बाळगू नका शासनाच्या आदेशाचे पालन कर,रोज मास्क लावा,सुरक्षित अंतर ठेवूनच एकमेकांशी संवाद साधा,सॅनिटायझर किंवा साबणाने वेळोवेळी हात स्वच्छ करा,स्वछता राखा या सगळ्या गोष्टींचे जर तुम्ही काळजी घेत असाल तर तुम्ही भीती बाळगण्याची गरज नाही.
🙏वेळ काढून वाचल्याबद्दल धन्यवाद🙏