Sunday, November 29, 2020

आनंदीत जीवन जगणे म्हणजे काय ?

मनातले विचार पूर्ण वाचा मग समजेल

नमस्कार, मी ओंकार फार लोकांना माहिती नसेल आपण नूतकाच फेसबुक वर *मनातले विचार* हा पेज काढलेल आहे. याच्या माध्यमातून काही आपल्या आयुष्यातील अनुभवे तुमच्या समोर मांडतोय
‌      आनंदीत जीवन जगणे म्हणजे काय आनंद माणसाला कधी होतो सांगा जेव्हा सगळ्या गोष्टी त्याचा मनासारखं होतात तेव्हा ना बरोबर का! आता या सर्वाचा उत्तर बरोबर असाच येईल आनंदीत जीवन जगणे म्हणजे मजा करणे, आवडतं ते खाणे पिणे, हा नाही आहे आनंदीत जीवन जगणे म्हणजे आपल्या अंतरमनाला वाटलं पाहिजे की जे काही आपण जीवन जगतोय ना ते आनंदीत आणि प्रामाणिक पणे आरोग्यदायी जगतोय हे वाटलं पाहीजे प्रत्येक माणसाला त्याचा स्वतःचा कुठलाही चूक असुदे हे त्याला कधी कळत नाही त्याचा मनाला कळतो जेव्हा तो स्वतःला आरशात बघतो ना तेव्हा कळतो प्रत्येकाने आनंदीत जीवन जगण्यासाठी खूप काही करतात नवीन घर घेतात नवीन मोबाईल घेतात  गाडी,कार घेतात पण एकदा मनाला विचारा अरे तू आनंदी आहेस का? असा प्रश्न कधी आपल्याला पडलाय का? कारण आजच्या युगात जे जीवन जगतोय ते फक्त कुठल्या ना कुठल्या टेन्शन मध्येच जगत असतो. प्रत्येकाच्या जीवनात अडचणी येतात व ते दूर होतात पण तरीही आपण आनंदी राहत नाही कारण आनंदी राहिल्यासारखं आपण फक्त जगाला दाखवतो बरोबर ना! माणूस कधी आनंदी राहतो माहिती आहे का ज्यावेळेस त्याच्या अवती-भोवती वातावरण चांगला असतो त्याची माणस त्याच्याबद्दल चांगले विचार करतात आणि तो माणूस सुद्धा त्याचा मनासारखं वागतो तेव्हा आणि दुसऱ्या गरजू लोकांना मदत करतो ना तेव्हा आपल्या डोळ्यात एक वेगळा आनंदच दिसून येतो . आनंदीत जगण्यासाठी आपण काय करायला पाहीजे सर्व मित्रांना परिवारात सगळ्यांशी चांगले राहणे प्रेमाने बोलणे थोर लोकांना आदर पूर्वक बोलने गरजूंना मदत करणे मी म्हणत नाही की तुम्ही सगळ्यांना करा पण करा एखादा माणसाला तरी मदत करा त्यापासून जे आनंद मिळतो ना तेे कधीच कुठल्याही कारणाने मिळत नाही


‌वाचल्यावद्दल खुप खूप🙏🙏
‌आवडल तर जास्तीत लोकांना शेयर करा